Friday, October 19, 2007

आम्ही दोघ

Myspace Love Icons

निळाशार गोव्याचा समुद्र,
"
आजतरी जमिन काबीज करुच " म्हणुन ऊसळून येणारी प्रत्येक लाट ,
आणि मग " येतेच परत " म्हणुन मागे जाणारी तीच लाट ,
भीजलेल्या वाळूमधून उघड्या

पायाने केलेली पायपीट,
पाण्याचा हवाहवासा वाटणारा गारवा ,
मंद वाऱ्याची झुळूक,
अंगावर आलेले

शहारे,
आम्ही दोघे,
उगाच सुरू असलेली बडबड,
मधेच फुलणारे हास्याचे
फवारे,

निळे आकाश ... सगळा आसमंतच
Myspace Love Icons
निळा,
या निळाईत निघालेल्या कॉलेजमधल्या आठवणी ,
कॉलेजमधली लफडी,
कॉलेजमधली खुन्नस ,
कॉलेजमधल्या पैजा,

Myspace Beach Iconsप्रोफेसर,
जरनल ... काही हरवलेली पाने ... काही जागवलेल्या रात्री ,
हॉस्टेल मधले संगीतमंडळ,
बासरीवाला फुल्या , गिटार घेऊन राजा , गायला मात्र सगळाच गाव आणि माझी रूम ,
दुपारचे जेवण, मामाचा डब्बा , भरपूर गप्पा आणि माझी रूम ,
जेवणानंतरची सुस्ती, बेड वर १० जण आणि माझी रूम ,
लॉबी मधे cricket, टकाटक बॉल आणि cricket महाकुंभ !
Badminton mix doubles
आणि बाजूची तोबा गर्दी , Badminton Men Singles आणि ओसाड कोर्ट!
कॉलेज
कॉलेज
कोवळे कोवळे प्रेम,
घडवलेले प्रेम , उडवलेले प्रेम , बनवलेले प्रेम ,
प्रेमाच्या व्याख्या, प्रेमावर debate, प्रेमातील भावना आणि भावना भोसले


Myspace Love Icons

रोज डे , चॉकलेट डे, वॅलेंटाईन डे , ट्रॅड डे
गॅदरींग, गाणे, दंगा , कोजागीरीची दारू
कॉमन ऑफ ... पी एल् ...

लॉन ... ची ट्रेन ... बरेच काही

परत एक पायावर पाण्याची झुळूक,
"
येईन परत" सांगून जाणारी लाट ,
माझ्या हातामधे एकजीव झालेला तिचा हात,
तिचे निखळ हासू ,
कधीही आसू यावे असा गोड चेहरा,
चेहऱ्यावर आलेली एक बट ,
कपाळावरून खाली भुवईपर्यंत ...
वाऱ्याबरोबर हेलकावे खाणारी बट आणि " माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही " म्हणणारी ती

परत एक पाण्याची झुळूक ...
आमची पहीली भेट,
मनामधले हलकेसे हेलकावे ... अगदी त्या वाऱ्यावर हलणाऱ्या बटी सारखे
एक अगतीकता ...
बरेचसे ' घडवून' आणलेले योगायोग ...
लिहीलेली emails ...
मोठे मोठे chats
उगाच केलेले वाद ...
मधे मधे लुडबुडणारे मित्र
पुर्वीची अर्धवट प्रेम प्रकरणे ...
ती सांगण्याआधीची घालमेल
सांगीतल्यानंतर वाटलेले समाधान
सर्व काही सेट असतानाही ... प्रपोज करताना उडालेली धांदल
उत्तरासाठीची उत्सुकता!

आणि एक झुळूक पायावर ...
परत तेच सांगणारी लाट
सुखावणारा गारवा
तिचेनिखळ हासू
काहीतरी
करून दाखवायची जिद्द
"
तू फक्त बरोबर उभा राहा , बाकी मी बघून घेईन " हे सांगतानाचा तिचा आत्मविश्वास
बघीतलेली स्वप्ने ...
आलेले अनुभव
मधेच निःशब्द संवाद
उगाच क्षितीजावर काहीतरीशोधणारी नजर
एकमेकाच्या अनुभवामधे
काही ना काही साम्य शोधणारे आम्ही दोघे
हातामधलाMyspace Love Iconsहात आणि परत एक झुळूक ... पायावर

No comments: