
तू फ़क्त 'नाही' म्हण
काहीच स्पष्टीकरण नको देऊसतू फ़क्त "नाही" म्हण.
मी समजेन
मी वळेन
मी निघेन
निघून जाईन कायमचा...
पण तू " नाही" नाहीच म्हणणार
तुला मी हवाय
'ऑप्शन' ला
सेकंड , थर्ड, फ़ोर्थ ऑप्शन
म्हणुन फ़क्त मैत्री ..."शुद्ध मैत्री "
माझं प्रेम काय अशुद्ध आहे ?
3 comments:
भन्नाट!!! :))
पुढे असं -
आणि माझ्याच शुद्ध प्रेमाने केलंय मनाला शुद्ध गाढव,
ज्याला तुझा हा खेळ कळतोय पण वळत नाही,
मैत्री तर मैत्री, अगदी नातं तुटण्यापेक्षा बरी म्हणून,
कधीतरी हो म्हणशील ही आशा काही सोडत नाही.
पण मग अस्सा वैताग वैताग झाला की पुन्हा वाटतं,
तू फ़क्त नाही म्हण.. तू एकदाचं नाही म्हण!
म्हणजे मी आनंदाने सुटेन,
आणि हे नातं तोडल्याचं पाप मात्र तुझ्या माथी बसेल!
माझं प्रेम काय अशुद्ध आहे ? .....
सहिच रे मित्रा... छान लिहिल आहेस...
Post a Comment